नवी दिल्ली : उत्तर दिल्लीतील इंद्रलोक परिसरात आज सकाळी नऊच्या सुमारास तीन मजली इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली पाच मुले आणि तीन महिलांसह 10 जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना अनेकांना बाहेर काढण्यात यश आले आहे.
ही इमारत 50 वर्षे जुनी होती. तीन मजली इमारत अचानक कोसळली. या इमारतीत तीन कुटुंबे राहत होती. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांपैकी बारा जणांना बाहेर काढण्यात यश आले. पोलीस, प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने ढिगारा उपसण्याचे काम सुरु होते.
जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इमारत कोसळण्यामागचे कारण नेमके समजू शकलेले नाही. इमारतीन पुनर्निमाणचे काम सुरू असल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.