स्मृती इराणी यांचा गौप्यस्फोट, माझेही झाले होते ओझे!

 लहानपणीच माझे ओझे झाले होते. माझा जन्म झाला त्यावेळी अज्ञात व्यक्तीने, 'बेटी तो बोझ होती है' असे माझ्या आईला सांगितले. तिला मारून टाका, असा धक्कादायक सल्ला दिला.  मात्र, माझी हिम्मतवाली होती. तिने याकडे दुर्लक्ष करुन मला लहानाची मोठी केली, असा धक्कादायक गौप्यस्फोट केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी केलाय.

PTI | Updated: Jun 28, 2014, 06:45 PM IST
स्मृती इराणी यांचा गौप्यस्फोट, माझेही झाले होते ओझे! title=

भोपाळ : लहानपणीच माझे ओझे झाले होते. माझा जन्म झाला त्यावेळी अज्ञात व्यक्तीने, 'बेटी तो बोझ होती है' असे माझ्या आईला सांगितले. तिला मारून टाका, असा धक्कादायक सल्ला दिला.  मात्र, माझी आई हिम्मतवाली होती. तिने याकडे दुर्लक्ष करुन मला लहानाची मोठी केली, असा धक्कादायक गौप्यस्फोट केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी केलाय.

मुलगी कुटुंबावर ओझे असते. तिला जन्मत:च मारुन टाकायला हवे, असे एकाने सुचविले होते. मात्र माझी आई निर्भय होती आणि तिने त्या अज्ञात व्यक्तीची सूचना अमलात आणली नाही. त्यामुळेच आज मी तुमच्यासमोर उभी आहे. स्त्रीभ्रूण हत्येबाबत काही विद्यार्थ्यांनी इराणी यांना प्रश्न विचारले. त्यावेळी हे धक्कादायक गुपित उघड केले. स्त्रीभ्रूण हत्येसारखे प्रकार थांबलेच पाहिजेच आणि सरकारचेही त्यालाच प्राधान्य आहे, असेही इराणी म्हणाल्या. 

मुलगी शिकली म्हणजे संपूर्ण कुटुंबाला कुटुंबाला शिक्षण दिल्यासारखे ठरते आणि त्याची देशाच्या उभारणीसाठी मदत होते. मुलींना शिक्षणाबरोबरच त्यांचा हक्क दिला पाहिजे. तसेच यापुढे शैक्षणिक समानतेचा प्रश्न राष्ट्रीय शिक्षण धोरणात हाताळला जाईल. बेरोजगारीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शिक्षण आणि कौशल्यविकास यांची सांगड घालण्यास सरकार बांधील आहे, असे इराणी यांनी सांगितले.

तसेच मानव संसाधन विकास मंत्रालय राष्ट्रीय पातळीवर ई-ग्रंथालय प्रकल्प निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे विशाल ज्ञानाची कवाडे उघडी होतील. यासाठी आंतरराष्ट्रीय ग्रंथालयांशीही समन्वय साधण्यात येईल, अशी माहिती यावेळी स्मृती इराणी यांनी यावेळी दिली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.