अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या कॅब ड्रायव्हरने रेडिओ ऐकला आणि...

देशात दिवसेंदिवस बलात्कारांच्या घटना वाढतच चालल्यात. दिवसाला आपण अशा प्रकारच्या बातम्या ऐकत, वाचत असतो. या घटनांमध्ये महिलांनाच दोषी ठरवले जाते. दिल्लीमध्ये झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणातील अनेकांनी त्या मुलीलाच दोष दिला होता. 

Updated: Dec 20, 2015, 10:52 AM IST
अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या कॅब ड्रायव्हरने रेडिओ ऐकला आणि... title=

नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस बलात्कारांच्या घटना वाढतच चालल्यात. दिवसाला आपण अशा प्रकारच्या बातम्या ऐकत, वाचत असतो. या घटनांमध्ये महिलांनाच दोषी ठरवले जाते. दिल्लीमध्ये झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणातील अनेकांनी त्या मुलीलाच दोष दिला होता. व्हिडीओ पाहा बातमीच्या खाली

बलात्कारासारखा गुन्हा चीन, सौदी अरेबिया, इजिप्त, इराण, उत्तर कोरिया, अफगाणिस्तानसारख्या देशात घडल्यास त्या आरोपीचा तो शेवटचा गुन्हा असतो. भारतात अशी परिस्थिती आहे का? याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर गाजतोय. 

एक महिला रात्रीच्या प्रवासासाठी कॅब मागवते. थोडे अंतर पुढे गेल्यानंतर या महिलेला झोप लागते. त्यावेळी हा कॅब ड्रायव्हर तिच्यावर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नात असतो. मात्र त्याचवेळी रेडिओवर बलात्कार प्रकरणी विधान होते. ते वाक्य ऐकल्यानंतर ड्रायव्हरचे धाबे दणाणते आणि तो हा विचार सोडून देतो. लोकांच्या जागरुकतेसाठी हा व्हिडीओ बनवण्यात आलाय.