www.24taas.com, पाटणा
तिहार जेलमध्ये कँपस प्लेसमेंट सुरू केल्या गेल्या आहेत. यामध्ये २४ कंपन्या ३० कैद्यांना नोकरीसाठी भरती करुन घेणार आहेत. यापूर्वी फेब्रुवारी २०१० साली तिहार जेलमध्ये कँपस प्लेसमेंट आयोजित करण्यात आली होती. यात १४२ कैद्यांना नोकऱ्या देण्यात आल्या होत्या.
जेलचे प्रवक्ते सुनील गुप्ता यासंदर्भात बोलताना म्हणाले, जेलमध्ये ज्यांची वागणूक चांगली आहे, अशा ३० जणांच्या मुलाखती घेण्यात येतील. चांगल्या वागणुकीमुळे पुढील सहा महिन्यात य़ा कैद्यांची मुक्तता होणार आहे. त्यानंतर अशा कैद्यांना नव्याने चांगलं आयुष्य सुरू करता यावं, यासाठी नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या कैद्यांची शैक्षणिक पात्रताही तपासण्यात येणार आहे.
जेलच्या तीन नंबर सेलमध्ये मुलाखती घेण्यात येणार आहे. यात निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना सेल्स एक्सेक्युटिव्ह, टेडा एंट्री ऑपरेटर आणि मार्केटिंग एक्सेक्युटिव्ह या पदांवर घेण्यात येणार आहे.