‘वंदे मातरम्’ इस्लामविरोधी; माफी मागणार नाही!

संसदेत ‘वंदे मातरम्’चा घोर अवमान करणारे बसपाचे खासदार शफीकुर रहमान बर्क यांनी ‘वंदे मातरम्’ हे इस्लामविरोधी असल्याचे म्हटले आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 10, 2013, 02:43 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
संसदेत ‘वंदे मातरम्’चा घोर अवमान करणारे बसपाचे खासदार शफीकुर रहमान बर्क यांनी ‘वंदे मातरम्’ हे इस्लामविरोधी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे केलेल्या कृत्याची मी माफी मागणार नाहीच, पण वेळ आली तर पुन: पुन्हा मी हा उद्दामपणा करेन, असे देशद्रोही वक्तव्य बर्क यांनी केले आहे.
बुधवारी सभागृहात वंदे मातरम् धून वाजण्याची घोषणा झाली तेव्हा सर्व उपस्थित खासदार आपआपल्या जागेवर उभे राहिले. राष्ट्रगीत सुरू होताच खासदार शफीकुर रहमान बर्क हे आपल्या जागेवरून उठून सभागृहाबाहेर निघून गेले. वंदे मातरमचा हा घोर अवमान लोकसभा अध्यक्ष मीराकुमार यांच्या नजरेतून सुटला नाही. वंदे मातरम् पूर्ण होताच मीराकुमार यांनी एक खासदार सभागृहाबाहेर गेल्याचे सांगितले.

थोड्या वेळाने शफीकुर रहमान सभागृहात परतले तेव्हा मीराकुमार यांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. तुम्ही केलेल्या कृत्याची मी गंभीर दखल घेतली आहे. त्याचे स्पष्टीकरण द्या आणि अशी घटना पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या, अशी तंबीही त्यांनी शफीकुर रहमान बर्क यांना दिली. परंतु बर्क यांची मस्ती कायम होती. वंदे मातरम् हे इस्लामविरोधात आहे. म्हणून या राष्ट्रगीताला विरोध करण्यासाठीच मी सभागृह सोडून गेलो. आणि असाच प्रसंग पुढे आला तर आज मी जे केले ते पुन: पुन्हा करेन, असे त्यांनी सांगितले.
रहमान यांना नोटीस बजावणार
वंदे मातरम् हे राष्ट्रगीत आहे आणि राष्ट्रगीताचा अपमान केल्याबद्दल लोकसभा अध्यक्ष मीराकुमार खासदार शफीकुर रहमान यांना नोटीस पाठवणार असल्याचे सूत्राने सांगितले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.