नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी तोंडाची बडबड करत वादग्रस्त व्यक्त करणाऱ्याा मंत्र्यांची चांगलीच खरडपट्टी काढलेय. त्यांनी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांची कान उघाडणी केली.
अधिक वाचा : दलित घटना : कुत्र्याला दगड मारल्यास सरकारचा काय संबंध : व्ही. के. सिंग
मंत्र्यांनी विधानं करताना काळजी घेतली पाहिजे. विधानाचा विपर्यास केल्याची सबब देऊ नये, अशा शब्दांत राजनाथ सिंग यांनी माजी लष्कर प्रमुख व्ही. के. सिंग यांना खडसावले. हरियाणामधल्या दलित हत्याकांडावर व्ही. के सिंग यांनी अत्यंत आक्षेपार्ह विधान केलं होतं. कुत्र्यावर दगड मारला तर त्याला सरकार कसं जबाबदार, असे व्ही. के. सिंग म्हणाले होते.
अधिक वाचा : दादरीमधील घटना ही पूर्वनियोजित : अल्पसंख्याक आयोग
व्ही. के. सिंग यांच्यावर टीका झाल्यानंतर आपल्या दोन वाक्यांचा एकत्र अर्थ लावला गेल्याची सारवासारवही त्यांनी केली होती. तसेच माफीही मागितली होती. मात्र ही सबब पुरेशी नसल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांनी म्हटले आहे. आधी चुकीचे वागायचे नंतर माफी मागण्याला काय अर्थ?
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.