सावधान! कार आणि बाईक्सच्या किंमती वाढणार...

ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये आता किंमती वाढवण्यावर विचार-विनियम सुरू आहे. ‘इनपुट कॉस्ट’ वाढल्यानं तसंच लॉजिस्टिक चार्जेस वाढल्यानंही कार आणि बाईकच्या किंमती वाढवाव्या लागतील, असं कंपन्यांचं म्हणणं आहे. पण, यामध्ये ग्राहकांच्या मागणीवरही लक्ष कायम ठेवण्याचं कसब कंपन्यांना उचलावं लागणार आहे. 

Updated: Nov 5, 2014, 04:04 PM IST
सावधान! कार आणि बाईक्सच्या किंमती वाढणार...  title=

मुंबई : ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये आता किंमती वाढवण्यावर विचार-विनियम सुरू आहे. ‘इनपुट कॉस्ट’ वाढल्यानं तसंच लॉजिस्टिक चार्जेस वाढल्यानंही कार आणि बाईकच्या किंमती वाढवाव्या लागतील, असं कंपन्यांचं म्हणणं आहे. पण, यामध्ये ग्राहकांच्या मागणीवरही लक्ष कायम ठेवण्याचं कसब कंपन्यांना उचलावं लागणार आहे. 

ह्युदाई मोटार इंडियानं पुढच्या काही दिवसांत आपल्या उत्पादनांच्या किंमतीत थोडीफार वाढ होईल, असं जाहीर केलंय. मारुती सुझुकी आणि बीएमडब्ल्यूसारख्या कंपन्या ग्राहकांची प्रतिक्रिया काय असेल? यावर विचार करत आहेत. 

काही कंपन्यांनी तर याअगोदरच किंमतीत वाढ केलीय. टू व्हिलर सेगमेंटमध्ये मार्केट लीडर मोटोकॉर्पनं गेल्याच महिन्यात बाईक आणि स्कुटरच्या किंमतींमध्ये 600 रुपयांची वाढ केलीय. होंडा मोटारसायकल अॅन्ड स्कुटर इंडियानं किंमती वाढवल्यात.

सणांच्या दिवसांत डिस्काऊंट आणि मोफत गिफ्टस् दिल्यानंही ऑटोमोबाईल कंपन्यांच्या प्रॉफिट मार्जिनवर परिणाम दिसून आलाय. जुलै-सप्टेंबरमध्ये घरगुती बाजारात प्रत्येक कारवर 21,000 रुपये डिस्काउंट दिल्यानं मारुती सुझुकीचं प्रॉफिट मार्जिन 20 बीपीएसनं घसरलंय. 

ऑटोमोबाईल कंपन्यांची नजर आता एक्साईज ड्युटी बेनेफिट बद्दल सरकारचं धोरण काय असेल, यावर टिकून आहे. या बेनिफिटचा कालावधी डिसेंबरमध्ये संपतोय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.