झारखंडमध्ये सापडली नेताजींची गाडी!

 झारखंडच्या धनबादमध्ये एक गाडी सध्या लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलीय. नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आपल्या 1930-40 दरम्यान केलेल्या दौऱ्यासाठी हीच कार वापरली होती, असा दावा केला जातोय. 

Updated: Jul 30, 2014, 01:51 PM IST
झारखंडमध्ये सापडली नेताजींची गाडी! title=
फाईल फोटो

रांची :  झारखंडच्या धनबादमध्ये एक गाडी सध्या लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलीय. नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आपल्या 1930-40 दरम्यान केलेल्या दौऱ्यासाठी हीच कार वापरली होती, असा दावा केला जातोय. 

ही गाडी इथल्याच भारत कोकिंग कोल लिमिटेड (बीसीसीएल)च्या एका बंद प्लान्ट वेअरहाऊसमधून सापडलीय. या गाडीचा इतिहास लक्षात घेऊन बीसीसीएलनं ही गाडी 22 जुलै रोजी कोयला नगर स्थित गेस्ट हाऊसवर पाठवली.

गाडीचा इतिहास समजल्यानंतर ‘पुटकी बलिहारी माइन्स’चे जनरल मॅनेजर के सी मिश्रा यांनी या कारचं जतन करण्यासाठी बीसीसीएल मॅनेजमेंटकडे परवानगी मागितली. ही कार फोर्ड सुपर डीलक्स मॉडल आहे. ही गाडी सुभाषचंद्र बोस यांचे काका अशोक बोस यांची आहे. अशोक बोस हे इस्ट इंडिया कंपनीच्या बराडी कोक प्लान्टमध्ये केमिकल इंजीनिअर होते. नेताजी धनबादमध्ये राहत असताना ते ही कार वापरत होते.  

कारच्या इंजिनवर एसडी 108459 एफ मॉडल 6ए असं लिहिलंय. या गाडीचा चेसिस नंबर 2617 एसजीएएनटी एम 13220 असा आहे आणि कारचं रजिस्टेशन नंबर आहे बीआरआर 3201... 

धनबाद हा 24 ऑक्टोबर 1956 रोजी नवीन जिल्हा बनला होता. यापूर्वी धनबाद हा बिहारच्या मनभूम जिल्ह्याचा भाग होता.

दुसरीकडे, बीसीसीएलचे चेअरमन कम मॅनेजिंग डायरेक्टर टी के लाहिडी यांनी मात्र या कारच्या ऐतिहासिक महत्त्वाला दुजोरा देण्यास नकार दिलाय. लोकांनी केलेल्या दाव्यानुसार नेताजींनी धनबादमध्ये वास्तव्यास असताना या कारचा वापर केला होता आणि त्याच आधारावर या गाडीला संरक्षण दिलं गेलंय.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.