नवी दिल्ली: सीबीआयनं सोशल मीडियावर अश्लील एमएमएस क्लिपबद्दलच्या तपासात बंगळुरूतून एका मुख्य आरोपीला अटक केलीय.
सीबीआय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कौशिक कुओनरला गुरूवारी तपासादरम्यान अटक करण्यात आलीय. हा तपास हायकोर्टाच्या निर्देशानुसार होतोय. तपासादरम्यान 500हून अधिक अश्लील क्लिप जप्त करण्यात आल्या.
यानंतर कोर्टानं याप्रकरणी सीबीआय तपासाचे आदेश दिलेत. कोणत्याही प्रकरणात गुन्ह्याचं स्थान आणि वेळेबाबत स्पष्ट माहिती नाहीय. एजंसीनं या व्हिडिओ संदेशांची माहितीचा तपास करण्यासाठी आधुनिक फॉरेंसिक सॉफ्टवेअरचा वापर करणार आहे. याद्वारेच कौशिकचा तपास लावला गेला.
एका क्लिपसंबंधी एजंसीनं पहिले ओडिशामध्ये दोघांना अटक केली होती. सूत्रांनी सांगितलं की, गुरुवारी छाप्यादरम्यान सीबीईई टीम छुपे कॅमेरे, आधुनिक सॉफ्टवेअर आणि इतर उपकरणांना पाहून आश्चर्यचकित झालेत. ज्याचा वापर असे व्हिडिओ बनविण्यासाठी केला जात होता. आरोपी एका संपन्न कुटुंबातील आहे आणि पुढील तपासासाठी त्याला दिल्लीला आणलं जाणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.