नोटबंदीनंतर चंद्रबाबू नायडू यांनी दर्शवली नाराजी

नोटाबंदी होऊन चाळीस दिवस उलटले तरी फारशी लोकांचा त्रास कमी झालेला नाही, असं एनडीए समर्थक चंद्राबाबू नायडूंनी म्हटलंय. नोटाबंदी व्हावी अशी आमची इच्छा नव्हती पण ती झाली. चाळीस दिवस उलटले तरी लोकांची डोकेदुखी कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. त्यावर काही उपायही दिसत नाही आहे. तेलगू देसम पक्षाच्या आमदार, खासदारांच्या एका महत्वाच्या बैठकीत चंद्राबाबू नायडूंनी हे विधान केलं.

Updated: Dec 21, 2016, 05:16 PM IST
नोटबंदीनंतर चंद्रबाबू नायडू यांनी दर्शवली नाराजी title=

हैदराबाद : नोटाबंदी होऊन चाळीस दिवस उलटले तरी फारशी लोकांचा त्रास कमी झालेला नाही, असं एनडीए समर्थक चंद्राबाबू नायडूंनी म्हटलंय. नोटाबंदी व्हावी अशी आमची इच्छा नव्हती पण ती झाली. चाळीस दिवस उलटले तरी लोकांची डोकेदुखी कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. त्यावर काही उपायही दिसत नाही आहे. तेलगू देसम पक्षाच्या आमदार, खासदारांच्या एका महत्वाच्या बैठकीत चंद्राबाबू नायडूंनी हे विधान केलं.

चंद्राबाबू नायडू हे देशात नोटाबंदीनंतरच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठीच्या समितीचे प्रमुख आहेत. या निर्णयानंतर रोज दोन तास समस्यांवर उपाय शोधण्यावर घालावेल लागतात. कितीही डोकेफोड केली तरी समस्या सुटत नाहीत असंही चंद्रबाबूंचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे चंद्रबाबूंनी नोटाबंदीच्या निर्णयाचं सुरुवातीला स्वागत केलं होतं.