जम्मू-काश्मिर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण आज लेहमध्ये करण्यात आलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आलं. हा पुतळा साडेसात फूट उंचीचा असून नागपुरातून हा पुतळा नेण्यात आला होता.
लेह लडाखमध्ये भारतीय आणि परदेशी पर्यटक मोठ्या संख्येनं येत असतात. त्यांना डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची आणि विचारांची प्रेरणा मिळावी म्हणून हा पुतळा बसवण्यात आला आहे.
Honoured & happy to unveil first statue of Dr Babasaheb Ambedkar amidst the grand, mighty Himalayas, in Leh ! pic.twitter.com/d0ItS4IHvz
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 24, 2016