नवी दिल्ली : कोळसा घोटाळा प्रकरणात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग अडचणी आलेत. कोळसा घोटाळ्यातील तपासावरुन पटीयालातील विशेष कोर्टानं आज सीबीआयला फटकारलं.
तत्कालीनं कोळसा मंत्र्यांची चौकशी करण्याची आवश्यकता आपल्याला का वाटली नाही ? असा सवाल कोर्टानं केला. कोळसा खाणींचं वाटप झालं तेव्हा कोळसा खातं तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडेच होतं. या प्रकरणात पंतप्रधान कार्यालयातील संबंधित
अधिका-यांची चौकशी का केली नाही, असा सवालही कोर्टानं केला. यावर उत्तर देताना सीबीआयनं तत्कालीन कोळसामंत्र्यांनी चौकशीची परवानगी दिली नसल्याचं नमूद केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.