धार्मिक हिंसा खपवून घेणार नाही, मोदींचा थेट इशारा

 धार्मिक हिंसा आणि असहिष्णूता यावर पंतप्रधान मौन धारण करतात अशी टीका विरोधकांकडून सुरु असतानाच मंगळवारी मोदींनी याविषयी रोखठोख भूमिका मांडली. देशभरात कोणत्याही प्रकारची धार्मिक हिंसा खपवून घेणार नाही अशी इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे. 

Updated: Feb 17, 2015, 04:17 PM IST
धार्मिक हिंसा खपवून घेणार नाही, मोदींचा थेट इशारा title=

नवी दिल्ली:  धार्मिक हिंसा आणि असहिष्णूता यावर पंतप्रधान मौन धारण करतात अशी टीका विरोधकांकडून सुरु असतानाच मंगळवारी मोदींनी याविषयी रोखठोख भूमिका मांडली. देशभरात कोणत्याही प्रकारची धार्मिक हिंसा खपवून घेणार नाही अशी इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे. 

दिल्लीत गेल्या दिवसांपासून चर्चवर हल्ले होत असून देशाच्या अन्य भागांमध्येही हिंदूत्वावादी संघटनेचे नेते प्रक्षोभक विधान करत वातावरण चिघळवत आहे. केंद्रात मोदींची सत्ता आल्यापासून देशभरात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्यानं मोदींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं होतं. अखेरीस मंगळवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात मोदींनी मौन सोडलं. मोदी म्हणाले, आमचे सरकार प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य मिळेल याची दक्षता घेईल, कोणालाही कोणत्याही दबाबाविना त्याच्या धर्माचं अनुकरण करता येईल. 

कोणत्याही धर्माच्या कोणत्याही समुहानं जर धर्माच्या आधारे हिंसा पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. आमचं सरकार कोणत्याही धार्मिक गटाच्या छुप्या किंवा उघड हिंसा खपवून घेणार नाही असा इशाराच त्यांनी कट्टरतावादी संघटनांना दिला.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.