नवी दिल्ली: दिल्लीत जेव्हा आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत होते. तेव्हा एक धक्कादायक प्रकार दिल्लीत घडला. सनलाइट परिसरात एका इमारतीच्या पार्किंगमध्ये एका ६५ वर्षीय वृद्धाला हॉकी स्टीकनं बेदम मारहाण करण्यात आलीय. या मारहाणीचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झालेत.
सोमवारी १४ फेब्रुवारी २०१५ला सकाळी १०.३०च्या सुमारास संरक्षण खात्यातील सेवानिवृत्त अधिकारी पुरणचंद्र गोस्वामी यांनी आपले शेजारी केशव गुप्ता यांना आपल्या घरासमोर कार पार्क न करण्यास सांगितलं त्यांच्यात थोडा वाद झाला आणि गुप्ता यांनी आपल्या घरात जावून हॉकी स्टीक आणली आणि गोस्वामींना मारायला सुरूवात केली.
यात मारहाणीत गोस्वामी यांचा हात फ्रॅक्चर झाला असून त्यांचा मुलगा जखमी झालाय. दरम्यान, पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.