भारत बंद : कोणाचा सहभाग, कोणाचा नाही?

एफडीआय आणि डिझेल दरवाढीविरोधात विरोधी पक्षांनी भारत बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये युपीएचे काही घटकपक्षही सहभागी झाल्यामुळे विरोधकांना हुरूप आला आहे. मात्र, भारत बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय बहुजन समाज पक्षाने केला आहे. तर राष्ट्रवादी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बंदत सहभागी होणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. मुंबईत भारत बंदला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. तर पुण्यातील भाजप संपात उतरलेले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 20, 2012, 09:04 AM IST

www.24taas.com,मुंबई,नवी दिल्ली
एफडीआय आणि डिझेल दरवाढीविरोधात विरोधी पक्षांनी भारत बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये युपीएचे काही घटकपक्षही सहभागी झाल्यामुळे विरोधकांना हुरूप आला आहे. मात्र, भारत बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय बहुजन समाज पक्षाने केला आहे. तर राष्ट्रवादी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बंदत सहभागी होणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. मुंबईत भारत बंदला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. तर पुण्यातील भाजप संपात उतरलेले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
बंदमध्ये राष्ट्रवादी, बसप आणि मनसेने सहभाग न घेतल्याने रिटेल क्षेत्रात बसपच्या या निर्णयामुळे सरकारला थोडा दिलासा मिळाला आहे. सरकारच्या निर्णयाला बसपचा विरोध असला, तरी यूपीएला बाहेरून पाठिंबा द्यावयाचा की नाही, याचा निर्णय हा पक्ष दहा ऑक्टो बरला करणार आहे.
आजच्या भारत बंदमध्ये पुण्यात भाजप सहभागी होणार नाही. गणेशोत्सव आणि पर्युषण पर्वमुळं बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय भाजपनं घेतलाय. डिझेल दरवाढ आणि एफडीआयविरोधात एनडीएनं भारत बंदची हाक दिलीय.. मात्र पुण्यात गणेशोत्सवाचा उत्साह आणि पर्युषण पर्वमुळं बंदमध्ये भाजप सहभागी होणार नसल्याचं शहराध्यक्ष विकास मठकरी यांनी सांगितलंय.तसंच पुण्यातल्या नागरिकांनी ऐच्छिक बंद पाळावा असं त्यांनी म्हटलंय.
तृणमूल नेत्या ममता बॅनर्जींनी सरकारचा पाठिंबा काढत, युपीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. शुक्रवारी तृणमूलचे मंत्री राजीनामा देतील, असं सांगत त्यांनी सरकारला फेरविचारासाठी मुदत दिलीय. तर काँग्रेसकडून ममतांना चुचकारण्याचे प्रयत्न सुरुच आहेत. तर सपा, भाजपनं या निर्णयाचं स्वागत केले आहे.

केंद्र सरकारनं घेतलेले दोन महत्त्वाचे निर्णय विरोधकांसह काँग्रेसच्या काही मित्रपक्षांनाही पसंत पडलेले नाहीत. गुरूवारी होणा-या भारत बंदमध्ये ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस आणि करूणानिधींचा डीएमके हे पक्ष सहभागी होणार आहेत. यामुळे हा भारत बंद अधिक यशस्वी होईल असं विरोधक मानतायत.
एकीकडे सरकारमधलेच काही पक्ष भारत बंदमध्ये असताना एनडीएमधली शिवसेना मात्र या बंदमध्ये सक्रीय असणार नाही. महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धूम असल्यामुळे या भारत बंदला केवळ तात्विक पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतलाय.
शिवसेना, मनसेचा या बंदला सक्रीय पाठिंबा नाही. त्यातच दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जनही गुरूवारी होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये बंदला कसा प्रतिसाद मिळतो, याबाबत शंका उपस्थित केली जातेय.
गुरूवारच्या भारत बंदला एनडीएमधले भाजपा, संयुक्त जनता दल, सेक्युलर जनता दल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, बीजू जनता दल, तेलगू देसम, आरएसपी तर काँग्रेसचे मित्रपक्ष डीएमके, समाजवादी पार्टी यांचा पाठिंबा आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा, तृणमूल काँग्रेस हे सत्ताधारी पक्ष बंदमध्ये सहभागी होणार नाहीत.
जनहिताविरोधात घेतलेल्या या निर्णयांचा निषेध करण्यासाठी पुकारण्यात आलेला हा बंद यशस्वी होईल, असा विरोधकांचा दावा आहे.