हैदराबाद/भुवनेश्वर : चक्रिवादळाने विशाखापट्ट्नम किनाऱ्यावर धडक मारली आहे. तुफान वादळ असल्याने अनेक ठिकाणी पडझड झाली असून दोघांचा या वादळाने मृत्यू झाला. मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
वादळामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत कोसळली तर अनेक ठिकाणी विद्युतपुरवठा खंडीत झाला आहे. त्यातच पाऊस पडत असल्याने जनजीवनावर याचा परिणाम झाला आहे. चक्रिवादळ आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टनम किनाऱ्यापासून ९० किमीपर्यंत दूर आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार दुपारी १२ नंतर हे वादळ विशाखापट्टन किनाऱ्यावर धडकेल.
साधारण १८० किमी प्रतीतास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. वादळामुळे समुद्रात ३० मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. कोणीही समुद्रात जाऊ नये असे आवाहन करताना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.