दार्जिलिंग : दार्जिलिंगची जगप्रसिद्ध टॉय ट्रेन पाच वर्षाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा चहाच्या मळ्यामधून धावणार आहे. २०१० मध्ये दरड कोसळ्यामुळे कुर्सिंयांग ते न्यू जलपाईगुडी दरम्यान ही सेवा बंद करण्यात आली होती. आता नाताळाला ही टॉय ट्रेन पुन्हा धावण्यासाठी सज्ज झालीय.
दार्जीलिंगची ही प्रसिद्ध टॉय ट्रेन तुम्ही अनेक हिंदी सिनेमातून बघीतली असेल. या ट्रेनमधून सफर करण्याचा मोह तुम्हालाही झाल्याशिवाय राहणार नाही.पर्यटानाची आवड असणा-यांसाठी ही गुड न्यूज आहे. गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेली ही ट्रेन लवकरच सुरु होणार आहे. २०१० मध्ये दार्जीलिंग जिल्ह्यातील कुर्सियांग परिसरात दरड कोसळल्यामुळे या टॉय ट्रेनच्या रुळांचं मोठं नुकसान झालं होतं.पासून कुर्सियांग ते न्यू जलपायीगुडी दरम्या ही ट्रेन सेवा बंद करतेव्हाण्यात आली होती.
गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात या रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचं काम पूर्ण करण्यात आलं आणि त्यानंतर या मार्गावर टॉय ट्रेनची अनेकवेळा चाचणी घेण्यात आली. यावर्षी १२ जुनला पुन्हाही सेवा सुरु करण्यात आली मात्र पुन्हा दरड कोसळ्यामुळे ती बंद करण्य़ात आली.आता पुन्हा एकदा या मार्गची पाहणी करण्यात आली असून नाताळा दरम्यान दार्जिलिंगची ही जगप्रसिद्ध टॉय ट्रेन पुन्हा धावणार आहे.
ही सेवा सुरु करण्यापूर्वी न्यू जलपाईगुडी ते दार्जिलिंग दरम्यानच्या अरुंद मार्गची पाहणी करण्यात येणार आहे. दार्जिलिंगची ही टॉय ट्रेन जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असून युनेस्कोने या ट्रेनला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिला असून १९९९ मध्ये दार्जिलिंग हिमालय रेल्वेला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषीत केलं आहे.
१८८१ मध्ये ही ट्रॉय ट्रेन दार्जिलिंगच्या डोंगरातून पहिल्यांदा धावली.नॅरो गेजवर धावणा-या या ट्रेनच्या रुळाची लांबी ८८.४८ किमी इतकी आहे.चहाच्या मळ्यांनी वेढलेल्या निसर्गरम्य डोंगर द-यातून ही ट्रेन धावते. तेव्हा नाताळाच्या सुट्टीत तुम्ही दार्जिलिंगला जाणार असाल तर या विश्वप्रसिद्ध टॉय ट्रेनमधून तुम्हाला सफर करता येणार आहे..
ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.