चेन्नईची मोदींकडून हवाई पाहाणी, एक हजार कोटींची मदत

मुसळधार पावसाने तामिळनाडूला जोरदार झोडपून काढले. पावसाने होत्याचे नव्हते केले. कित्येक कोटींचे पावसामुळे नुकसान झाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नई आणि परिसराची हवाई पाहाणी  केली. त्यानंतर मोदी यांनी एक हजार कोंटीची तातडीची मदत जाहीर केली.

PTI | Updated: Dec 3, 2015, 08:46 PM IST
चेन्नईची मोदींकडून हवाई पाहाणी, एक हजार कोटींची मदत title=

चेन्नई : मुसळधार पावसाने तामिळनाडूला जोरदार झोडपून काढले. पावसाने होत्याचे नव्हते केले. कित्येक कोटींचे पावसामुळे नुकसान झाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नई आणि परिसराची हवाई पाहाणी  केली. त्यानंतर मोदी यांनी एक हजार कोंटीची तातडीची मदत जाहीर केली.

केंद्र सरकारकडून तमिळनाडू सरकारला मदतकार्यासाठी एक हजार कोटी रुपयांची अतिरिक्त आर्थिक मदत तातडीने देण्याची घोषणा मोदी यांनी यावेळी केली. याआधी केंद्र सरकारने ९४० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. 

तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनीही नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना तेथील परिस्थितीबद्दल माहिती दिली. चेन्नईमध्ये अडकलेल्या परराज्यातील नागरिकांना तेथून परत आणण्यासाठी एअर इंडियाकडून हैदराबाद ते अराक्कोनममधील नौदलाच्या तळापर्यंत विशेष विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. 

दरम्यान, वेधशाळेने आंध्र प्रदेश आणि केरळलाही पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली आहे. लष्कराचे जवान आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या जवानांनी अडकलेल्यांना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.