मुंबई : मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी दाऊद इब्राहिमचा मुलगा भारतात राहतो, अशी धक्कादायक माहिती दिल्लीचे माजी पोलीस कमिश्नर नीरज कुमार यांनी दिली आहे.
नीरज कुमार यांनी म्हटल्यानुसार, दाऊदने बॉलीवूडमधील एका अभिनेत्रीशी लग्न केलं होतं. सीबीआयचे संयुक्त निर्देशक असलेले नीरज कुमार यांच्या माहितीनुसार दाऊदचा मुलगा बंगळुरूत राहतो. संबंधित अभिनेत्रीच्या बहिणीकडे हा मुलगा राहत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
नीरज कुमार यांचं पुस्तक डायल डी बाजारात येणार आहे, तेव्हा अनेक आश्चर्यकारक बाबी बाहेर येणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.