शहीद शक्तीमानचा उभारला पुतळा

काही दिवसांपूर्वी उत्तराखंड पोलिसांचा घोडा शक्तीमानचा मृत्यू झाला. शक्तीमानला त्याचा डावा पाय गमवावा लागला होता आणि त्यानंतर त्याला कृत्रिम पाय लावला गेला. पण उपचारांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये शक्तीमानचा मृत्यू झाला. 

Updated: Jul 10, 2016, 04:57 PM IST
शहीद शक्तीमानचा उभारला पुतळा title=

देहरादून : काही दिवसांपूर्वी उत्तराखंड पोलिसांचा घोडा शक्तीमानचा मृत्यू झाला. शक्तीमानला त्याचा डावा पाय गमवावा लागला होता आणि त्यानंतर त्याला कृत्रिम पाय लावला गेला. पण उपचारांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये शक्तीमानचा मृत्यू झाला. 

शक्तीमान हा शहीद झाला, तो आमच्यासाठी जवान होता, अशी प्रतिक्रिया उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी दिली होती. शक्तीमानला जेव्हा जखमी झाला तेव्हा एका भाजप आमदारार आरोप करण्यात आले होते. पण यामध्ये माझा काहीच दोष नसल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार गणेश जोशी यांनी दिली आहे. मी जर दोषी असेन तर माझाही पाय कापा असं जोशी आधी म्हणाले होते.

शक्तीमानची आठवण म्हणून आता त्याचा एक पुतळा आता उभारण्यात आला आहे.