अब्जाधीश संपत्ती, संसार सोडून बनला भिक्षक

दिल्लीमध्ये 'प्लास्टिक किंग' नावानं प्रसिद्ध असलेला अब्जाधीश बिझनेसमन भंवरलाल रघुनाथ दोषी अचानक चर्चेत आलाय. त्याचं कारण म्हणजे भंवरलालनं आपली 600 करोड रुपयांच्या संपत्तीवर पाणी सोडलंय... आणि हा मनुष्य आता चक्क भिक्षुक बनलाय. 

Updated: Jun 1, 2015, 07:46 PM IST
अब्जाधीश संपत्ती, संसार सोडून बनला भिक्षक

अहमदाबाद : दिल्लीमध्ये 'प्लास्टिक किंग' नावानं प्रसिद्ध असलेला अब्जाधीश बिझनेसमन भंवरलाल रघुनाथ दोषी अचानक चर्चेत आलाय. त्याचं कारण म्हणजे भंवरलालनं आपली 600 करोड रुपयांच्या संपत्तीवर पाणी सोडलंय... आणि हा मनुष्य आता चक्क भिक्षुक बनलाय. 

रविवारी गुजरातच्या अहमदाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य सोहळ्यात भंवरलालनं दीक्षा घेतलीय. 

दोन मुलं आणि एका मुलीचा पिता असलेल्या भंवरलालला अगोदरपासून दीक्षा घेण्याची इच्छा होती. जैन धर्माच्या संस्कारांनी त्यांची अध्यात्माकडे ओढ वाढतच होती. पण, या निर्णयासाठी आपल्या कुटुंबीयांना हे सर्व समजावण्यात त्यांना गेल्या वर्षीच यश मिळालं.  

या सोहळ्यात सहभागी झालेल्या जवळपास दीड लाखपैंकी 101 जणांनी येत्या पाच वर्षांत दीक्षा घेण्याचा संकल्प केलाय. अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.