भारत-पाक सीमारेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार

पाकिस्ताननं पुन्हा एकदा भारताला पुन्हा एकदा आव्हान दिलंय. पूँछमध्ये सीमारेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आलाय. रात्री 12 वाजता आणि सकाळी 6 वाजता पाकिस्तानकडून ही फायरिंग करण्यात आली. 

Updated: Jun 1, 2015, 06:13 PM IST
भारत-पाक सीमारेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार title=

पाकिस्तान : पाकिस्ताननं पुन्हा एकदा भारताला पुन्हा एकदा आव्हान दिलंय. पूँछमध्ये सीमारेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आलाय. रात्री 12 वाजता आणि सकाळी 6 वाजता पाकिस्तानकडून ही फायरिंग करण्यात आली. 

भारतानं मात्र या गोळीबाराला उत्तर देणं टाळलंय. उल्लेखनीय म्हणजे, या गोळीबाराच्या काही तास अगोदर परदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला समज दिली होती. पाकिस्तानकडून कारवाया झाल्या तर आम्ही शांत राहणार नाही, असं सुषमा स्वराज यांनी म्हटलं होतं. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या बीजिंग दौऱ्यादरम्यान पाकिस्तान आणि चीनमधला आर्थिक कॉरिडॉरचा मुद्दा उचलून धरला होता. भारताला हे अमान्य असल्याचंही त्यांनी बजावून सांगितलं होतं, असंही सुषमा स्वराज यांनी म्हटलंय.

पूँछमध्ये जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील तंगधारमध्ये दहशतवादी आणि सेनेमध्ये झालेल्या एन्काऊंटरमध्ये तीन दहशतावादी मारले गेले होते. हत्यारांसहीत दाखल झालेल्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानकड़ून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला पण सुरक्षादलानं त्यांना थोपवलं. 

यापूर्वी, 25 मेलाही तंगधारमध्ये घुसखोरीचा प्रयत्न झाला होता. यात दोन सैनिक शहीद झाले होते तर एक दहशतवादी ठार झाला होता.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.