लखनौमध्ये विमानाचे 'एमर्जन्सी लँडिंग'

विमानात एका प्रवाशांच्या छातीत दुखू लागले, आणि हृदयविकाराचा झटका आला, म्हणून भुवनेश्वर ते दिल्ली दरम्यान उड्डाण केलेले विमान तात्काळ लखनौच्या विमानतळावर उतरवावे लागले .

Updated: Jun 15, 2015, 06:40 PM IST
लखनौमध्ये विमानाचे 'एमर्जन्सी लँडिंग' title=

लखनौ : विमानात एका प्रवाशांच्या छातीत दुखू लागले, आणि हृदयविकाराचा झटका आला, म्हणून भुवनेश्वर ते दिल्ली दरम्यान उड्डाण केलेले विमान तात्काळ लखनौच्या विमानतळावर उतरवावे लागले .

विमानाने उड्डाण केल्यानंतर एका प्रवाशाच्या छातीत दुखू लागले आणि हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे एमर्जन्सी लँडिंग करावे लागल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

‘इंडिगो एअरलाइन्सचे हे विमान भुवनेश्वर येथून दिल्लीकडे चालले होते. शिवकुमार पानिग्रही या ५२ वर्षीय प्रवाशाला हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने रविवारी रात्री सव्वाआठ वाजता विमान लखनौमध्ये उतरवावे लागले,' असे विमानतळ संचालक एस.सी. होटा यांनी सांगितले. 

दरम्यान, रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिथे पानिग्रही यांना मृत घोषित करण्यात आले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.