व्हॉट्सअॅपवर झाली मैत्री, ती निघाली आईच्या वयाची, पाहून तरूण पळाला

व्हॉट्सअॅपवर महिलेशी मैत्री झाल्यावर तीने भेटायला बोलविल्यावर तरूण त्या ठिकाणी पोहचला पण त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ती महिला त्याच्या आईच्या वयाची निघाली. 

Updated: Jun 15, 2015, 06:28 PM IST
व्हॉट्सअॅपवर झाली मैत्री, ती निघाली आईच्या वयाची, पाहून तरूण पळाला title=

अमरोहा : व्हॉट्सअॅपवर महिलेशी मैत्री झाल्यावर तीने भेटायला बोलविल्यावर तरूण त्या ठिकाणी पोहचला पण त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ती महिला त्याच्या आईच्या वयाची निघाली. 

यूपीच्या गजरौलामध्ये एका रेस्टॉरंटमध्ये भेटीसाठी आतूर असलेल्या तरूणासाठी ती भेट खूप हादरा देणारी ठरली. वयस्कर महिलेला पाहून त्या तरूणाने रेस्टॉरंटमधून धूम ठोकण्याचा प्रयत्न केला तर महिलेने आरडाओरड सुरू केली. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले. कसे बसे तरूणाने स्वतःला या प्रकरणातून सोडवले. 

बिजनौरच्या जनपदच्या चांदपूर येथील रहिवासी युवकाचे हापुड येथील एका महिलेशी व्हॉट्सअॅपवरून चॅटिंग सुरू झाले. काही दिवसात त्यांची मैत्री झाली. महिलेने आपल्या प्रोफाइलवर एका तरूणीचा फोटो लावला ते पाहून तरूण फसला. 

दोघांनी व्हॉट्सअॅपवर अनेक महिने चॅटिंग केली. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका रेस्टॉरंटमध्ये भेटण्याचे ठरवले. आपल्या मित्राची कार घेऊन सकाळी १० वाजता रेस्टॉरंटमध्ये पोहचला. महिलाही त्यावेळी पोहचली. महिलेला पाहून तरूण हादरला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.