शाहरूखविषयी दिल्ली सरकारचे गौरी खानला पत्र

दिल्ली सरकारने थेट अभिनेत्यांच्या पत्नींना पत्र पाठवून गळ घातली आहे.

Updated: Mar 2, 2016, 03:44 PM IST
शाहरूखविषयी दिल्ली सरकारचे गौरी खानला पत्र

नवी दिल्ली : पान मसाल्याची जाहिरात करू नका, असं आवाहन दिल्ली सरकारने बॉलीवूडमधील अभिनेत्यांना केलं होतं, मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने आता, दिल्ली सरकारने थेट अभिनेत्यांच्या पत्नींना पत्र पाठवून गळ घातली आहे.

दिल्ली सरकारच्या स्वास्थ्य विभागातर्फे गौरी खान, काजोल, मलायका अरोरा-खान आणि सुनीता आहुजा यांना पत्र लिहिल आहे. तुमच्या पतीला पानमसालाची जाहिरात करण्यापासून परावृत्त करा, अशी विनंती केली आहे. 

पानमसाल्यात तंबाखू नसली तरी, त्यात सुपारी आहे, ती कॅन्सरसाठी कारणीभूत आहे, तेव्हा तुमच्या पतीला अशी जाहिरात करण्यापासून रोखा, तुमच्या पतीला यापूर्वी पत्र पाठवलं होतं, पण त्याला प्रतिसाद न मिळाल्याने, आपण त्यांना जाहिरात करण्यापासून रोखावे, अशी विनंती दिल्ली सरकारने अभिनेत्यांच्या पत्नींना केली आहे.