VIDEO : मुलाच्या हव्यासापायी वकिलाकडून पत्नी-मुलीचा अमानुष छळ

दिल्ली हायकोर्टाचा वकील असलेल्या एका इसमानं आपल्या पत्नीला आणि मुलीला केलेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

Updated: Dec 16, 2016, 08:27 AM IST
VIDEO : मुलाच्या हव्यासापायी वकिलाकडून पत्नी-मुलीचा अमानुष छळ title=

नवी दिल्ली : दिल्ली हायकोर्टाचा वकील असलेल्या एका इसमानं आपल्या पत्नीला आणि मुलीला केलेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

दक्षिण दिल्लीच्या वसंत कुंज या पॉश भागात हे कुटुंब राहतं. हा व्हिडिओ वकिलाच्या दुसऱ्या मुलीनं आपल्या मोबाईलमध्ये शूट केलाय. 

एक मिनिटाचा हा व्हिडिओ अंगावर काटा उभा करतो. आपल्या चिमुरडीला ती जमिनीवर कोसळल्यानंतरही तो मारहाण करताना दिसतोय. 

मुलगा झाला नाही म्हणून, आपल्या दोन मुलींचा आणि आपला 'तो' गेल्या कित्येक वर्षांपासून असाच छळ करत असल्याचं वकिलाच्या पत्नीनं म्हटलंय.  

मागच्या आठवड्यात हा व्हिडिओ दिल्ली पोलिसांकडे सोपवण्यात आला होता.