खडसे प्रकरणात भाजप नेत्यांमध्ये संभ्रम

एकनाथ खडसे यांच्याबद्दल काय निर्णय घ्यावा, याविषयी पक्षात संभ्रम असल्याचं दिसतंय. एकनाथ खडसे यांच्यावर नेमकी काय कारवाई करावी, राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर काय होईल किंवा खडसे काय भूमिका घेतील, लोकांमध्ये काय संदेश जाईल याची व्यवस्थित कल्पना नसल्याने पक्षात खडसेंवरील कारवाईविषयी विचार विनिमय सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

Updated: Jun 2, 2016, 05:51 PM IST
खडसे प्रकरणात भाजप नेत्यांमध्ये संभ्रम title=

नवी दिल्ली : एकनाथ खडसे यांच्याबद्दल काय निर्णय घ्यावा, याविषयी पक्षात संभ्रम असल्याचं दिसतंय. एकनाथ खडसे यांच्यावर नेमकी काय कारवाई करावी, राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर काय होईल किंवा खडसे काय भूमिका घेतील, लोकांमध्ये काय संदेश जाईल याची व्यवस्थित कल्पना नसल्याने पक्षात खडसेंवरील कारवाईविषयी विचार विनिमय सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

आज खडसेंनी मुंबईत गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत फोटो असलेले अनेक पोस्टर लावले, यात शुभेच्छूक खडसे आणि पंकजा मुंडे असले, तरी या पोस्टर्सवर पक्षाचं कुठेही नाव घेण्यात आलेले नाही, म्हणून खडसे राजीनाम्यानंतर आणखी आक्रमक भूमिका घेतील असं त्यांचे निकटवर्तीय सांगतात.