खडसेंवर कारवाई होणार नसल्याची दिल्लीत चर्चा

दिल्लीत मुख्यमंत्री अमित शहा यांच्या भेटीला गेले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सुरू आहे एकनाथ खडसे यांच्यावर आज निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Updated: Jun 2, 2016, 05:42 PM IST
खडसेंवर कारवाई होणार नसल्याची दिल्लीत चर्चा title=

नवी दिल्ली : दिल्लीत मुख्यमंत्री अमित शहा यांच्या भेटीला गेले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सुरू आहे एकनाथ खडसे यांच्यावर आज निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मात्र खडसेंची राजकीय शक्ती पाहता त्यांच्यावर झटपट निर्णय घेणे पक्षाला सध्या न परवडणारे असल्याचं सांगण्यात येत आहे, खडसे यांचं पक्षातलं ज्येष्ठपद आणि आगामी निवडणुका पाहता खडसे यांच्याविरोधात पक्ष कोणतीही कारवाई करणार नसल्याची चर्चा सध्या दिल्लीत आहे.