राहुल गांधींनी मौन सोडावं, दिग्विजय सिंहांनी सुनावलं

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांचे मौन सोडून त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडायला हवी आणि जनतेसमोर यायला हवं, असं परखड मत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी मांडलं आहे. लोकसभा निवडणुकीत ६३ वर्षीय वृद्ध व्यक्ती तरुणांना आकर्षित करु शकली आणि ४४ वर्षीय व्यक्ती यात अपयशी ठरली ही दुर्दैवी बाब आहे असं सांगत दिग्गीराजांनी काँग्रेसलाच घरचा आहेर दिला आहे. 

Updated: Aug 31, 2014, 09:50 PM IST
राहुल गांधींनी मौन सोडावं, दिग्विजय सिंहांनी सुनावलं title=

नवी दिल्ली: काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांचे मौन सोडून त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडायला हवी आणि जनतेसमोर यायला हवं, असं परखड मत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी मांडलं आहे. लोकसभा निवडणुकीत ६३ वर्षीय वृद्ध व्यक्ती तरुणांना आकर्षित करु शकली आणि ४४ वर्षीय व्यक्ती यात अपयशी ठरली ही दुर्दैवी बाब आहे असं सांगत दिग्गीराजांनी काँग्रेसलाच घरचा आहेर दिला आहे. 

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिग्विजय सिंह यांनी मुलाखात दिली असून यात त्यांनी राहुल गांधी यांच्या कामाच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली. 'सध्या प्रसारमाध्यमं आणि ब्रेकींग न्यूझचं जग आहे. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे सुनियोजीत पद्धतीनं प्रसारमाध्यमांमध्ये झळकत राहिले. 

काँग्रेसच्या पुनरागमनासाठी पद्धतीनं राहुल गांधी यांनीदेखील त्यांचं मौन सौडून जनतेसमोर यायला हवं, असं दिग्विजय सिंह यांनी सांगितलं. 

जनतेला राहुल गांधी ब्रँड काय आहे, त्यांची भूमिका काय हे जाणून घ्यायचं असल्यानं राहुल गांधींसाठी हे सर्व गरजेचं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधींना सहकार्य केलं नव्हतं, हे वृत्तही दिग्गीराजांनी फेटाळून लावलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.