लव्ह जिहाद: रकीबुलच्या घरावर छापा, 15 मोबाईल, 36 सिमकार्ड जप्त

रांची पोलिसांनी रविवारी तारा सहदेव केसमध्ये कारवाई करत रणजीत कोहली उर्फ रकीबुल हसनच्या घरावर छापा घातला. पोलिसांनी रकीबुलच्या घरातून 15 मोबाइल फोन, 36 सिमकार्ड, 4 प्रिंटर, 1 पेन ड्राइव्ह, 2 एअर गन आणि 1 प्रोजेक्टर जप्त केलंय. रकीबुलच्या घरी तारा सहदेवसोबत झालेल्या लग्नाचे कागदपत्रही मिळाले. 

Updated: Aug 31, 2014, 04:40 PM IST
लव्ह जिहाद: रकीबुलच्या घरावर छापा, 15 मोबाईल, 36 सिमकार्ड जप्त title=

रांची: रांची पोलिसांनी रविवारी तारा सहदेव केसमध्ये कारवाई करत रणजीत कोहली उर्फ रकीबुल हसनच्या घरावर छापा घातला. पोलिसांनी रकीबुलच्या घरातून 15 मोबाइल फोन, 36 सिमकार्ड, 4 प्रिंटर, 1 पेन ड्राइव्ह, 2 एअर गन आणि 1 प्रोजेक्टर जप्त केलंय. रकीबुलच्या घरी तारा सहदेवसोबत झालेल्या लग्नाचे कागदपत्रही मिळाले. 

रकीबुलच्या एवढं संशयास्पद सामान सापडल्यानं त्याच्यावरील संशय आणखी वाढलेला आहे. या प्रकरणी न्यायाधिश, पोलीस आणि नेत्यांचा रकीबुलसोबत संपर्क असल्याचं पुढं आलंय. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी प्रकरणाची सीबीआय चौकशी करणार असल्याचं म्हटलंय.

सोरेननं सांगितलं की, पीडिता तारा सहदेव आणि त्यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. मुख्यमंत्री म्हणाले, तारा सहदेव पोलिसांच्या चौकशीनं संतुष्ट नसून त्यांना पारदर्शक तपास हवाय. म्हणून आम्ही प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचा निर्णय घेतलाय. 

कोर्टानं कोहली आणि त्याच्या आईला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.