मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राईक करत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा काल मध्यरात्रीपासून बंद केल्यानंतर याबाबत सामान्यांच्या मनात खूप संभ्रम आहेत.
यात काळा पैसा असणाऱ्यासोबत सामान्य मध्यमवर्गीय आणि गरिबांचीही झोप उडाली आहे. संभ्रमामुळे अनेकांना काल रात्री व्यवस्थित झोप आली नाही.
कोणताही सामान्य नागरिक आपल्या बँकेत जाऊन ११ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबरपर्यंत ४ हजार रुपयांच्या ५०० आणि एक हजारच्या नोटा नव्या चलनात बदलून दिल्या जातील. त्यानंतर हळूहळू सरकारकडे नव्या चलनाची उपलब्धता होईल तशा नोटा बदलून दिल्या जातील.
या योजनेची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या बँकेत कितीही रक्कम भरू शकतात. यात ५०० आणि १०००च्या नोटा असल्या तरी काही प्रॉब्लेम नाही.
ग्राहकाने आपल्या बँकेतील केवायसी (नो युवर कस्टमर) फॉर्म भरला नसेल तर त्याला ५०,००० पर्यंत भरणा करता येणार आहे. ज्याने केवायसी फॉर्म भरला असेल अशा ग्राहकाला आपल्या बँकेत अमर्याद पैसा भरता येणार आहे. पण यासाठी तुम्हांला या पैशाचा स्त्रोत कळवावा लागणार आहे.
- आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, दाखवून नोट बदलू शकतो.