मालकाचे प्राण वाचवण्यासाठी त्याने दिले प्राणाचे बलिदान

कुत्र्याला ईमानदार प्राणी म्हटले जाते. कुत्रा केलेली मदत कधीही विसरत नाही. त्यामुळे आपल्या मालकासाठी तो काहीही करायला तयार असतो. अशीच एक घटना केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्याती पेरुंबवर येथे घडलीये.

Updated: Mar 17, 2017, 09:05 PM IST
मालकाचे प्राण वाचवण्यासाठी त्याने दिले प्राणाचे बलिदान title=

पेरुंबवर : कुत्र्याला ईमानदार प्राणी म्हटले जाते. कुत्रा केलेली मदत कधीही विसरत नाही. त्यामुळे आपल्या मालकासाठी तो काहीही करायला तयार असतो. अशीच एक घटना केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्याती पेरुंबवर येथे घडलीये.

येथे राहणारे गंगाधरन आणि पत्नी विमला यांच्यासह त्यांचा पाळीव कुत्रा त्यांच्यासोबत राहात होता. माऊली असे त्या कुत्र्याचे नाव होते. त्याने मालकाचा जीव वाचवण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली. 

काही दिवसांपूर्वी गंगाधरन यांच्या घरात साप घुसला. साप घुसल्याचे कुत्र्याने पाहिले आणि तो जोरजोरात भुंकू लागला. 

तब्बल अर्ध्या तासाहून अधिक साप आणि कुत्रा यांच्यात लढाई सुरु होती. अखेर त्याने सापाला मारले मात्र सापाच्या दंशात या कुत्र्याने आपले प्राण गमावले. आपल्या मालकाचे प्राण वाचवण्यासाठी तो शेवटपर्यंत लढला मात्र त्यात त्याला आपले प्राण गमवावे लागले.