नवी दिल्ली : एके काळी डी कंपनीत सहभागी असणारा डॉन छोटा राजनला डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळचा छोटा शकील याने ठार मारण्याची धमकी दिली आहे.
आज दाऊदचा ६० वा वाढदिवस आहे. त्यामुळे तो आपला उत्तराधिकारी जाहीर करण्याची शक्यता होती. मात्र, दाऊद तसे काही करणार नाही. दाऊद मागच्या बाकावर बसण्याची शक्यता नाही. त्यामुळे दाऊद डी कंपनीची सूत्रे कायम आपल्याकडे ठेवणार असल्याचे दाऊदचा भाऊ अनीस अहमद यांने स्पष्ट केलेय. अशी सूत्रांकडून माहिती देण्यात आलेय.
अधिक वाचा : दाऊद येणार बुलेटप्रुफ गाडीने, ३ कोटींचे रिव्हॉल्वर भेट
दाऊदचा उत्तराधिकारी म्हणून छोटा शकीलचे नाव चर्चेत होते. मात्र, छोटा राजनला संपविण्याचा त्याने विडा उचललाय. छोटा राजनला इंडोनेशियात अटक केल्यानंतर त्याला भारतात आणण्यात आले. दिल्लीतील तिहार जेलमध्ये छोटा राजन आहे. त्याला वेगळ्या खोलीत ठेवण्यात आलेय. छोटा राजनला तिहार जेलमध्ये मारण्याची धकमी छोटा शकीलने दिलेय.
दाऊद रिटायर होणार नाही!
दरम्यान, छोटा राजनकडून डी कंपनीला कोणताही धोका नाही. राजन तिहार जेलमध्येच मरेल. तो मेलेला साप आहे, असे छोटा शकीलने म्हटलेय. असे असले तरी त्याचा गेम केला जाईल, असे छोटा शकीलने इंडिया टुडे समूहाच्या वृत्तपत्राला दिलेल्या वृत्तात म्हटलेय. दाऊदचा रिटायर होण्याचा कोणतीही योजना नाही. दाऊद फिट आहे. तो धार्मिक झालाय. पाच वेळा तो नपाज पडतो आणि दर वर्षी तो मक्काला जातो.
अधिक वाचा : अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा वारस होणार शनिवारी जाहीर
छोटा राजनला विदेशात मारण्याचा आम्ही खूप प्लान केला. मात्र, त्यात आम्ही यशस्वी झालेलो नाही. दाऊदच्या ग्रॅंट पार्टीबाबत सांगितले, तसा कोणतीही योजना नाही. मात्र, छोटी पार्टी असेल. त्यात कुटुंबीय आणि अन्य परिवारातील सदस्य सहभागी होतील.