चार दिवसांत साईंच्या चरणी पावणे चार कोटींचं दान

शिर्डीत चार दिवसीय दसरा उत्सवात साईभक्तांनी साईचरणी भरभरुन दान दिलंय.

Updated: Oct 15, 2016, 08:25 AM IST
चार दिवसांत साईंच्या चरणी पावणे चार कोटींचं दान title=

शिर्डी : शिर्डीत चार दिवसीय दसरा उत्सवात साईभक्तांनी साईचरणी भरभरुन दान दिलंय.

चार दिवसांच्या दानाची शुक्रवारी मोजदाद करण्यात आली. या चार दिवसांत साई भक्तांनी ३ कोटी ७५ लाखांचं दान अर्पण केलंय. यात सोने, चांदी, रोख रक्कम तसेच परदेशी चलनाचा समावेश आहे. 

यात साई संस्थानच्या दक्षिणा पेटीत १ कोटी ९३ लाख रोख रक्कम... त्याच बरोबरीने डोनेशन काऊंटरवर ९३ लाख रुपये आणि ऑनलाईन डोनेशन द्वारे २६ लाख अस दान आलाय. 

सोबतच ७ लाखांचं परकीय चलन आणि २३ लाखांच ८६५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणी एक किलो चांदीही भक्तांनी साईंना अर्पण केली आहे.