मुंबई : तुमचं स्टेट बँक ऑफ इंडिया अर्था एसबीआयमध्ये अकाऊंट असेल तर तुम्हाला यापुढे निर्धारित किमान बॅलन्स राखणं अनिवार्य करण्यात आलंय.
एसबीआयनं मेट्रो शहरांत किमान बॅलन्स 5000 रुपये निर्धारित केलाय तर शहरी भागात किमान बॅलन्स 3000 रुपये आहे. अर्ध-शहरी भागात ही मर्यादा 2000 रुपये तर ग्रामीण भागांत 1000 रुपये निर्धारित करण्यात आलीय.
निर्धारित करण्यात आलेल्या किमान बॅलन्सहून कमी बॅलन्स जर तुमच्या अकाऊंटमध्ये असेल तर 1 एप्रिलपासून तुम्हाला दंड लावण्यात येणार आहे.
मेट्रो शहरांत जर किमान बॅलन्स 75 टक्क्यांहून कमी असेल तर सर्व्हिस टॅक्ससोबत 100 रुपयांचा दंड असेल. किमान बॅलन्स 50-75 टक्क्यांदरम्यान असेल तर सर्व्हिस टॅक्ससोबत 75 रुपयांचा फाईन असेल तर 50 टक्क्यांहून कमी बॅलन्स उरला तर सर्व्हिस टॅक्ससोबत 50 रुपयांचा दंड भरावा लागेल.
तर ग्रामीण भागांत किमान बॅलन्स न राखल्यास सर्व्हिस टॅक्सवर 20 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागेल.
1 एप्रिलपासून हे नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत. शिवाय एसबीआय ब्रान्चमध्ये एका महिन्यात तीन कॅश ट्रान्झक्शननंतर केल्या जाणाऱ्या प्रत्येक ट्रान्झक्शनवर 50 रुपयांचा दंडही आकारला जाईल.