www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॅटरी बिघाडामुळे बंद झालेली ड्रीमलायनर ७८७ या विमानसेवा भरारीसाठी पुन्हा सज्ज झाली आहेत. ५ मेपासून त्याची चाचणी उड्डाणे घेण्यात येणार असून १५ मेपासून प्रवासी उड्डाणांची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईतील सहा ड्रीमलायनर विमानातील बॅटरी दुरूस्त करण्याचे काम बोईंगचे तंत्रज्ञांचे पथक वेगाने करीत आहेत. येत्या ५ मेपासून दिल्लीतून देशाअंतर्गत चाचणी उड्डाणे होतील. सध्या सहाही ड्रीमलायनर मुंबईत दुरूस्तीसाठी आहेत. मात्र दुरूस्ती झाल्यावर ती दिल्लीतूनच उडवली जाणार आहेत. त्यामुळे मुंबईतून होणारी या विमानाची उड्डाण लांबणीवरचं आहेत.
बोईंगची ड्रीमलायनर विमाने नोव्हेंबरपासून एअर इंडियाच्या ताफ्यात येण्यास सुरूवात झाली. मात्र, काही दिवसांतच त्यांच्या बॅटरीमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने त्यांना जानेवारी २०१३ पासून पुन्हा हँगरमध्येच बंदिस्त करण्यात आले. दोनच दिवसांपूर्वी एतिहाद एअरलाइन्सचे ड्रीमलायनर विमान बॅटरीदुरूस्तीनंतर पहिल्यांदा आकाशात उडविले व बॅटरी दुरूस्ती पूर्ण झाल्याची ग्वाही दिली.