नवी दिल्ली : भाजपचे खासदार आणि केंद्रीय शहरविकास मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या ड्रायव्हरचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांचा ड्रायव्हरचा मृतदेह उद्योग भवनात उभ्या असलेल्या कारमध्ये सापडला.
विनोद खंडुरी असे या मृत ड्रायव्हरचे नाव असून ५४ वर्षीय या ड्रायव्हरच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मृत्यूचे कारण समजू शकणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी उद्योग भवनात तैनात असलेल्या सीआयएसएफच्या जवानांनी पोलिसांना कॉल करून सूचना दिली. एक व्यक्ती या ठिकाणी बेशुद्ध पडला आहे. तुगलक रोड ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहचले आणि विनोदला कारमधून बाहेर काढले आणि हॉस्पिटलला पाठविले. त्या ठिकाणी त्याला मृत घोषीत करण्यात आले.
चौकशीनंतर समोर आले की विनोद हा बाबुल सुप्रियो यांचा ड्रायव्हर आहे. तसेच ज्या कारमधून हा मृतदेह सापडला ती कारही सुप्रियो यांची आहे. कारवर खासदाराचे स्टीकर आहे. पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे.
खासदारांचा ड्रायव्हर पत्नी आणि तीन मुलांसह राहत होता. मंगळवार दुपारपासून त्याच्या मोबाईलवर कुटुंबिय फोन करत होता. पण तो फोन पिक करत नव्हता. कुटुंबियांनी सुप्रियो यांच्या निवासस्थानी आणि ऑफीसमध्ये फोन करून खंडुरीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, या ठिकाणी त्याची माहिती नव्हती.
खंडुरीच्या कुटुंबियांनी त्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार मंगळवारी पोलिस ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी पोस्टमार्टम रिपोर्टनंतर त्याचा मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द केला. त्यांच्यानुसार शरीरावर कोणत्याही प्रकाराच्या जखमांच्या खुणा नाहीत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.