नवी दिल्ली : यापुढे रेल्वेच्या प्रत्येक गाडीत आणि तिच्या प्रत्येक डब्यात सीसीटीव्हीची नजर असणार आहे. गाड्यांमध्ये होणारी महिलांची छेडछाड रोखण्यासाठी रेल्वे बोर्डानं हा निर्णय घेतलाय.
ईएमयू म्हणजेच लोकल गाड्या, डीएमयू आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये हे सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. रेल्वे बोर्डाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.
कपूरथलाच्या कोच फॅक्ट्रीमध्ये सीसीटीव्ही असलेल्या कोचची निर्मिती केली जाईल. येत्या वर्षअखेर काही निवडक गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम पूर्ण होईल.
गार्डच्या केबिनमध्ये सीसीटीव्हीचं मॉनिटरिंग युनिट असेल आणि गार्डच त्याची देखरेख करेल, असंही बोर्डाच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.