अमृतसर : पंजाबमध्ये एका आठ महिन्यांच्या बाळाचे वजन इतक्या झपाट्याने वाढतेय ज्यामुळे तेथील डॉक्टरही हैराण झालेत. जास्त वजनामुळे हे बाळ ना झोपू शकत ना नीट श्वास घेऊ शकतेय. सामान्य बाळाच्या तुलनेत या बाळास चारपटीने अधिक भूक लागते.
सोशल मीडियावर या बाळाची बातमी चांगलीच व्हायरल होतेय. हँबटालारोडच्या मोहमपुरा गावातील ८ महिन्यांच्या या बाळाचे वजन तब्बल २० किलो झालेय. जेव्हा हे बाळ जन्माला आले होते तेव्हा त्याचे वजन सामान्य बाळांइतकेच होते असे त्याच्या वडिलांनी सांगितलेय.
मात्र त्यानंतर आता त्याचे वजन झपाट्याने वाढतेय. डॉ. वासुदेव शर्मा यांच्या माहितीनुसार या बाळाला आजार असल्याने त्याचे वजन वाढतेय. दरम्यान, तपासणीनंतर या आजाराबाबत अधिक माहिती मिळू शकेल.
संपूर्ण कुटुंब दिवसाला जितके अन्न खाते तितके अन्न हे बाळ दिवसभरात खाते. त्याच्या झपाट्याने वाढणाऱ्या वजनामुळे कुटुंबातीलही सर्वच हैराण झालेत.