हिंमत असेल तर 'हॅकेथ्रॉन'मध्ये व्हा सहभागी

मतदानयंत्रामध्ये छेडछाड करून दाखवण्याचं राजकीय पक्षांनी दिलेलं आव्हान निवडणूक आयोगानं स्वीकारलं असून 3 जूनपासून या बहुचर्चित 'हॅकेथ्रॉन'ला सुरूवात होणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त नसिम झैदी यांनी जाहीर केलंय.

Updated: May 20, 2017, 10:08 PM IST
हिंमत असेल तर 'हॅकेथ्रॉन'मध्ये व्हा सहभागी title=

नवी दिल्ली : मतदानयंत्रामध्ये छेडछाड करून दाखवण्याचं राजकीय पक्षांनी दिलेलं आव्हान निवडणूक आयोगानं स्वीकारलं असून 3 जूनपासून या बहुचर्चित 'हॅकेथ्रॉन'ला सुरूवात होणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त नसिम झैदी यांनी जाहीर केलंय.

निवडणुकीच्या वेळी ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याचा आरोप करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना हे मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिलेलं आव्हानंच आहे. 

निवडणूक आयोग वापरत असलेल्या ईव्हीएमसोबत छेडछाड करणं अशक्य असल्याचा पुनरुच्चार झैदी यांनी केला. आगामी काळात VVPAT म्हणजे पेपर ट्रायल असलेल्या मशिन्सचा वापर प्रत्येक निवडणुकीत मर्यादित प्रमाणात करण्यात येईल, असंही झैदी यांनी जाहीर केलंय. 

मतदान यंत्रांबाबत शंका उपस्थित करणाऱ्या एकानंही आतापर्यंत त्यांच्या दाव्याला पुष्टी देणारा पुरावा सादर केला नसल्याचंही मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले.