यापुढे आपात्कालीन ११२ हा एकच नंबर

देशात आता आपात्कालीन एकच नंबर असण्याचे संकेत मिळाले आहेत. १००, १०१, १०२ आणि १०८ या क्रमांकाची जागा आता ११२ घेईल. दरम्यान, मोबाईल फोनची आऊटगोइंग सेवा बंद असली तरी मोबाईलवरून हा नंबर डायल करता येईल.

Updated: Apr 8, 2015, 09:10 AM IST
यापुढे आपात्कालीन ११२ हा एकच नंबर

नवी दिल्ली : देशात आता आपात्कालीन एकच नंबर असण्याचे संकेत मिळाले आहेत. १००, १०१, १०२ आणि १०८ या क्रमांकाची जागा आता ११२ घेईल. दरम्यान, मोबाईल फोनची आऊटगोइंग सेवा बंद असली तरी मोबाईलवरून हा नंबर डायल करता येईल.

 देशात १००, १०१, १०२ हे इमर्जन्सी नंबर आहेत; पण ‘ट्राय’ने सर्व आपत्कालीन स्थितीत ११२ हा एकच नंबर डायल करण्याचे ठरवले आहे. 

पोलीस, फायर ब्रिगेड आणि अॅम्बुलन्स सेवेसाठी दूरसंचार खात्याने देशभरात १००, १०१, १०२ हे नंबर्स इमर्जन्सी नंबर म्हणून घोषित केले आहेत. 

दरम्यान, अमेरिकेत ९११ हा एकच नंबर डायल केला जातो. या धर्तीवर भारतात ११२ हा नंबर ठेवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तशी सूचना ‘ट्राय’ने केली आहे. 

जरी एकच नंबर असला तरी १००, १०१, १०२ आणि १०८ हे पर्यायी नंबर म्हणून उपलब्ध असतीलच. या नंबरवर कॉल केल्यास तो थेट ११२ला जोडला जाईल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.