www.24taas.com,नवी दिल्ली
एक खुषखबर.....भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात सरकारनं पाव टक्क्यांची वाढ केलीय. व्याजदर आता सव्वा आठ टक्क्यांवरून साडे आठ टक्के करण्यात आलाय. तब्बल पाच कोटींपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. २०१२-१३च्या निर्वाह निधीच्या ठेवीवर हा दर देण्यात येणार आहे. कामगार मंत्र्यांच्या नेतृत्वात झालेल्या सेन्ट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.
गेल्या वर्षी ईपीएफवर ८.२५ टक्के व्याज देण्यात आले होते यंदा साठे आठ व्याज देणे शक्य असल्याची माहिती ईपीएफओने `सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज` म्हणजेच सीबीटीला यापूर्वीच कळवलं होतं. या विषयावर १५ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीही प्राथमिक विचार करण्यात आला होता.
या आर्थिक वर्षात साडे आठ टक्याच्या दरानं व्याज दर दिल्यानं ४ कोटी १३ लाख रुपयांची रक्कम अतिरिक्त उपलब्ध होण्याची आशा ईपीएफओने व्यक्त केलीय. ईपीएफच्या व्याज दराबाबत दरवर्षी जानेवारी महिन्यातचं घोषणा केली जाते, मात्र त्याला यंदा उशीर झालाय.