कोईम्बतूर: अतिशय दुर्मीळ जातीचा असा उडणारा साप कोईम्बतूरमध्ये सापडलाय. श्रीलंकन असलेला हा तीन फुटांचा उडता साप आहे. कोईमतूरजवळ हा साप सापडलाय.
निमविषारी वर्गातला हा साप आहे. एका झाडावरुन दुस-या झाडावर जाण्यासाठी तो शरीर चपटं करतो. श्रीलंका आणि भारतात अशा प्रकारचा साप आढळतो. त्याचं मुख्य अन्न पक्षी आणि पक्ष्यांची अंडी आहेत.
भारतातल्या काही ठिकाणी सोनसर्प म्हणून त्याला ओळखलं जातं. जुन्या झालेल्या मोठ्या वृक्षांवर या सापाचं वास्तव्य असतं.
#WATCH: 3-foot long rare Sri Lankan flying snake rescued in the outskirts of Coimbatore by a rescue team(March 20)https://t.co/AcLDZ7HiEq
— ANI (@ANI_news) 21 March 2016