www.24taas.com,नवी दिल्ली
बिहारमधील चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. सीबीआय कोर्टाचे न्यायाधिश बदलण्याची त्यांची विनंती कोर्टानं अमान्य केलीये.
चारा घोटाळा प्रकरणी सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालूप्रसाद यादव यांची याचिका आज फेटाळली आहे. या याचिकेत लालूप्रसाद यांनी न्यायाधीश बदलण्याची मागणी केली होती.कोर्टाच्या या निर्णयाने लालू प्रसाद यांना जबरदस्त झटका बसला आहे. तसेच या प्रकरणी लवकर निर्णय देण्याचेही निर्देश कोर्टाने दिले आहे.
लालू प्रसाद यांनी या याचिकेत न्यायाधीश पी.के.सिंह यांच्यावर भेदभाव केल्याचा आरोप केला होता.न्यायाधीश पी.के.सिंह हे बिहारचे शिक्षामंत्री पी.के.शाही के नातेवाईक असल्याने त्यांनी हा भेदभाव केला, असे यादव म्हणाले होते. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी अन्य कोर्टात करण्यात यावी, अशी मागणी यादव यांनी केली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.