नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया अभियानाचं समर्थन करण्यासाठी व्हिडिओकॉन टेलिकम्युनिकेशन्सनं पुढाकार घेतलाय.
व्हिडिओकॉनने ७५० एमबीपर्यंत मोफत मोबाईल इंटरनेट सुविधा देण्याची घोषणा केलीय. जे लोक सध्याच्या आधुनिक युगात इंटरनेटचा वापर करीत नाहीत, अशा लोकांसाठी खासकरुन ही सुविधा आणल्याचं कंपनीनं म्हटलंय.
ट्रायल बेसिसवर कंपनीनं इंटरनेटचा वापर न करणाऱ्या ग्राहकांसाठी ७५० एमबी डेटा देण्याची तयारी दाखवली आहे.
कंपनीच्या प्रेस रिलीजमध्ये असे सांगण्यात आले आहे कि, ग्राहकांना इंटरनेट डेटाबद्दल उपयोगी पडणारी अशी सगळी माहिती देण्यासाठी एक मोफत हेल्पलाइन सुविधा सुरु करण्यात येणार आहे.
व्हिडिओकॉन टेलिकम्युनिकेशन्सचे संचालक व सीईओ अरविंद बाली यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या डिजिटल इंडिया अभियानाअंतर्गत आम्ही ग्राहकांसाठी काही खास सेवा सुरु करण्याच्या विचारात होतो. समाजातील जो वर्ग अजूनही इंटरनेटच्या वापराबद्दल अनभिज्ञ आहे किंवा त्याचा वापर करण्यात संकोच करतात. अशा लोकांसाठी खास ही सेवा आम्ही घेऊन आलो आहोत.'
मध्यप्रदेश, छत्तीसगढ, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहार ह्या राज्यात व्हिडिओकॉन टेलिकम्युनिकेशन्स आपली सेवा पुरवतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.