आता रेल्वेचे तात्काळ तिकीट दर विमानाप्रमाणे वाढणार

रेल्वेने तोटा कमी करण्यासाठी नवनवीन उपाय शोधण्यास सुरूवात केली आहे, पण याचा मोठा आर्थिक फटका हा प्रवाशांना बसणार आहे. हा फटका  रेल्वेचं तात्काळ तिकीट काढणाऱ्यांच्या खिशाला बसणार आहे. रेल्वेचं तात्काळ तिकीटांचे दर विमानाच्या तिकीट दराप्रमाणेच वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Updated: Jan 20, 2015, 08:45 PM IST
आता रेल्वेचे तात्काळ तिकीट दर विमानाप्रमाणे वाढणार title=

नवी दिल्ली : रेल्वेने तोटा कमी करण्यासाठी नवनवीन उपाय शोधण्यास सुरूवात केली आहे, पण याचा मोठा आर्थिक फटका हा प्रवाशांना बसणार आहे. हा फटका  रेल्वेचं तात्काळ तिकीट काढणाऱ्यांच्या खिशाला बसणार आहे. रेल्वेचं तात्काळ तिकीटांचे दर विमानाच्या तिकीट दराप्रमाणेच वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

तात्काळ तिकीटांचा ५० टक्के कोटा संपल्यानंतर, पुढील ५० टक्क्यांसाठी वाढीव दर आकारण्यात येणार आहे. पुढच्या प्रत्येक १० टक्के तिकीटांच्या कोट्याला २० टक्क्यांप्रमाणे हे दर वाढणार आहेत, रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
 
हा निर्णय मध्य रेल्वेच्या गाड्यांना तातडीने लागू होणार आहे. या महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या असेलल्या १६ गाड्यांचा देखिल समावेश आहे.

१) 11005 दादर - पदुचेरी - साप्ताहिक एक्स्प्रेस

२)  11021 दादर - तिरुनेलवेली - साप्ताहिक एक्स्प्रेस

३) 11050 श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) - अहमदाबाद एक्स्प्रेस

४) 11088 पुणे - विरावल एक्स्प्रेस

५) 11090 पुणे - भगत की कोठी (जोधपूर) एक्स्प्रेस

६) 11092 पुणे - भूज एक्स्प्रेसम

७) 11096 पुणे - अहमदाबाद अहिंसा एक्स्प्रेस

८)  12051 दादर - करमाळी जनशताब्दी एक्स्प्रेस

९) 12101 लोकमान्य टिळक टर्मिनस - हावरा ज्ञानेश्वर एक्स्प्रेस

१०) 12129 पुणे - हावरा आझाद हिंद एक्स्प्रेस

११) 12809 छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई - हावरा मेल व्हाया - नागपूर

१२) 16351 छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई - नगरकोईल एक्स्प्रेस

१३) 16381 छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई - कन्याकुमारी एक्स्प्रेस

१४) 18029 लोकमान्य टिळक टर्मिनस - शालीमार एक्स्प्रेस

१५) 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस - मुजफ्फरपूर एक्स्प्रेस

१६) 11065 लोकमान्य टिळक टर्मिनस - दरभंगा एक्स्प्रेस   

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.