www.24taas.com, झी मीडिया, हरियाणा
भारतीय जनता पार्टीकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर आज पहिल्यांदाच नरेंद्र मोदी यांची हरियाणाच्या रेवाडी इथं जाहिर सभा होतेय. मोदी सभेच्या ठिकाणी हजर झालेत थोड्याच वेळात ते सभेला संबोधित करतील.
रेवाडी जिल्ह्यात मोठ्या संख्येने माजी सैनिक आहेत. या सभेत निवृत्त सेना प्रमुख व्ही. के. सिंगही उपस्थित आहेत. मोदींच्या या सभेसाठी मात्र जंगी तयारी करण्यात आलीय. सभेला लाखो लोकांची उपस्थिती असेल अशी शक्यता वर्तवण्यात आल्यानं मंडपापासून ते पिण्याच्या पाण्याचीही चोख व्यवस्था करण्यात आलीय.
१९९२ ते २००० पर्यंत नरेंद्र मोदी यांनी हरियाणाचं प्रभारी पद भूषवलं होतं. त्याच्या सभेसाठी बीजेपीनं संपूर्ण ताकद लावलीय यात शंकाच नाही.
मोदींचं माजी सैनिकांसमोर भाषण :
> अमेरीकेच्या स्टॅच्यु ऑफ लिबर्टीपेक्षा दुप्पट उंच स्टॅच्यु ऑफ युनिटी असेल
> वल्लभभाईंच्या जन्मस्थळावर गुजरातच्या भूमीवर त्यांचा पुतळा उभारणार
> देशाला एक करण्याचं काम लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं होतं
> शस्त्रात्र निर्मितीत भारत सक्षम कधी होणार?
> वाजपेयी सरकार असतं तर मार्ग निघाला असता
> सरकारनं श्वेतपत्रिका जाहीर करावी
> वन रँक, वन पेन्शन योजनेचं काय झालं? मोदींचा सरकारला सवाल
> युवकांनी सैनिकी परंपरांचा सन्मान करावा
> देश सक्षम असेल तर पाकिस्तान, चीन काही बिघडवू शकणार नाहीत
> बुद्धीमान तरुणांचा सैन्यात समावेश असणं गरजेचं आहे
> देशातील तरुणांना सेनेत जाण्याची इच्छा उरलेली नाही
> धर्मनिरपेक्षता समजून घ्यायची असेल तर भारताच्या सैनिकांकडून समजून घ्या
> धर्मनिरपेक्षता समजून घ्यायची असेल तर भारताच्या सैनिकांकडून समजून घ्या
> धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली देशाचे तुकडे तुकडे झालेत
> व्होटबँकेच्या राजकारणाचा दुर्गंध संपूर्ण देशात पसरलाय
> पाकिस्तानचा जन्म भारतविरोधी असला तरी प्रगती मात्र भारतविरोधी रस्त्यावरून होणार नाही
> लढायचंच असेल तर गरिबीशी लढा, दहशतवादाशी लढा, अंधश्रद्धेशी लढा - पाकिस्तानला मोदींचा सल्ला
> दहशतवाद मानवतेचा शत्रू आहे
> गेल्या वर्षात दहशतवादाविरुद्ध जे वातावरण तयार व्हायला हवं होतं ते झालं नाही
> पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धापेक्षा दहशतवादानं जनतेला त्रस्त आहे
> प्रत्येक तरुणानं शहीद स्मारकाला भेट द्यावी - मोदींचं आवाहन
> भारताची बोटचेपी भूमिका का? पाकिस्तानला सडेतोड उत्तर का नाही?
> देशाची सुरक्षा या सरकारची प्राथमिकता नाही - मोदी
> माझ्या देशासाठी मरणाऱ्या सैनिकांचं अपमान करू नका - मोदी
> सैनिकी शाळेत मला प्रवेश घ्यायचा होता, पण घेऊ शकलो नाही - मोदी
> सैनिकांचं काम संतांसारखंच - नरेंद्र मोदी
> अग्नी-५ मिसाईलच्या परिक्षणाबद्दल वैज्ञानिकांचं केलं अभिनंदन
> लष्कराच्या माजी सैनिकांसमोर जोडले हात
राज्यवर्धन सिंग राठोड, नेमबाज
सरकारनं लष्कराला नपुंसक केलंय... सुरक्षा मजबुतीसाठी नरेंद्र मोदींचीच सत्ता हवी, असं वक्तव्य या सभेच्या वेळी नेमबाज राज्यवर्धन सिंग राठोडनं केलंय. पाकिस्ताननं काश्मीरकडे वाईट नजरेनं पाहिलं तर पाकिस्तान राहणार नाही, असंही राठोडनं मोठ्या जोशात म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.