close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

जीव धोक्यात घालून एक्सप्रेस रेल्वेसमोर स्टंट

जीव धोक्यात घालून स्टंट करणाऱ्यांना त्यांचा स्टंट म्हणजे धाडस वाटत असलं तरी, हा विकृतपणा मृत्यूला कारणीभूत ठरु शकतो. असाच एक स्टंटचा व्हिडिओ उत्तर प्रदेशातून समोर आला आहे.

Updated: Jul 16, 2016, 04:57 PM IST
जीव धोक्यात घालून एक्सप्रेस रेल्वेसमोर स्टंट

लखनऊ : जीव धोक्यात घालून स्टंट करणाऱ्यांना त्यांचा स्टंट म्हणजे धाडस वाटत असलं तरी, हा विकृतपणा मृत्यूला कारणीभूत ठरु शकतो. असाच एक स्टंटचा व्हिडिओ उत्तर प्रदेशातून समोर आला आहे.

गाजियाबाद जिल्ह्यातल्या मसूरी पोलीस ठाणे हद्दीतला हा व्हिडिओ आहे. तिथे गंगनहर नदी पुलावरच्या रेल्वे ट्रॅकवर सात मुलं ओळीने उभी राहिली. या रेल्वेमार्गावरुन वेगाने येणाऱ्या गाडीसमोर कोण उशीरापर्यंत उभा राहतो, अशी त्यांच्यामध्ये पैज लागली होती. त्यानुसार जेव्हा समोरुन एक्स्प्रेस गाडी अत्यंत वेगात येत होती, तेव्हा या सात जणांपैकी प्रत्येकानं एकएक करुन, तीस फूट उंचावरच्या पुलावरुन खाली नदीत उडी मारली.

हा सर्व जीवघेणा प्रकार इतका भयानक होता, की ही मुले आणि अत्यंत वेगाने येणारी गाडी यांच्यामध्ये अक्षरशः काही फुटांचंच अंतर शिल्लक होते.