'लव्ह जिहाद रोखण्यासाठी मुलींवर गोमूत्र शिंपडा'

पोटनिवडणुकांमध्ये ‘लव्ह जिहाद’चं भांडवल केल्यामुळे भारतीय जनता पार्टीला तोंडावर पडावं लागलंय, असं म्हटलं जातंय. लोकसभा निवडणुकीत आघाडीवर असलेल्या भाजपला उत्तरप्रदेशात झालेल्या पोटनिवडणुकीत जनतेनं सरळ सरळ नाकारलंय.

Updated: Sep 18, 2014, 10:39 AM IST
'लव्ह जिहाद रोखण्यासाठी मुलींवर गोमूत्र शिंपडा' title=

नवी दिल्ली : पोटनिवडणुकांमध्ये ‘लव्ह जिहाद’चं भांडवल केल्यामुळे भारतीय जनता पार्टीला तोंडावर पडावं लागलंय, असं म्हटलं जातंय. लोकसभा निवडणुकीत आघाडीवर असलेल्या भाजपला उत्तरप्रदेशात झालेल्या पोटनिवडणुकीत जनतेनं सरळ सरळ नाकारलंय.

आदित्यनाथसारख्या नेत्यांकडून लव्ह जिहादच्या मुद्यावर समर्थन मिळालं. हिंदू मुलींना मुस्लिम मुलांकडून फसवून धर्म परिवर्तन करण्यापासून रोखण्यासाठी भाजपचे नेते जोरदार प्रयत्न करताना दिसतायत. 

लव्ह जिहाद रोखण्यासाठी हिंदू मुलींना ट्रेनिंगही दिलं जातंय. एका इंग्रजी दैनिकानं दिलेल्या बातमीनुसार, गोव्याच्या हिंदू जनजागृती समितीनं हिंदू मुलींसाठी काही सल्ले दिलेत... 

यामध्ये, मुलींवर गोमूत्र शिंपडलं जावं, खाऱ्या पाण्यात आंघोळ करणं, लिंबूनं पूजा करणं, लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुलींच्या कहाण्या त्यांना सांगितल्या जाव्यात अशा काही सल्ल्यांचाही समावेश आहे.   

‘आम्ही लव्ह जिहादचा गेल्या तीन वर्षांपासून अभ्यास केलाय. आम्ही यावर एक पुस्तकही लिहिलंय... हे प्रकार रोखण्यासाठी आम्ही नव्यानं प्रयत्न करत आहोत. जेव्हापर्यंत आई-वडीलांना आपल्या मुलींच्या पालनपोषणात झालेली चूक समजणार नाही तेव्हापर्यंत या घटना टाळता येणार नाहीत’ असं धक्कादायक वक्तव्य समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केलंय.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.