नवी दिल्ली : शहरात महिलेला कारमध्ये ओढून नेऊन बलात्कार केल्याची घटना, शहरातील कालकाजी भागातही घटना घडली आहे, यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कालकाजी भागात कारमधून आलेल्या दोघांनी महिलेला कारमध्ये ओढून घेतले. मोटारीमध्येच दोघांनी सामूहिक बलात्कार केला. बलात्कारानंतर नेहरू प्लेसजवळ धावत्या गाडीमधून फेकून दिले. ही घटना मंगळवारी रात्री घडली आहे, अशी तक्रार महिलेने नोंदविली आहे.
दरम्यान, पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांपैकी एक जण वेश्या व्यवसायाशी जोडला गेलेला असून, पुढील तपास सुरू आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.